महा"राष्ट्र" चैतन्य.. | Charudatta Thorat Letest


महा"राष्ट्र" चैतन्य...
राष्ट्राचे चैतन्य जवानाचे हाती |
राष्ट्राचे चैतन्य संतऋषीजनांपथी |
राष्ट्राचे चैतन्य किसानाचे धान्यात |
राष्ट्राचे चैतन्य उदारहृदयी चिकीत्सकात || १ ||
राष्ट्राचे चैतन्य कर्मप्रिय कर्मयोगीयात |
राष्ट्राचे चैतन्य दानवीर श्रीमंतात |
राष्ट्राचे चैतन्य ज्ञानार्थी विद्यार्थ्यात |
राष्ट्राचे चैतन्य मार्गदायी शिक्षकात || २ ||
राष्ट्राचे चैतन्य राष्ट्रप्रेमी जीवात्म्यात |
राष्ट्राचे चैतन्य येथील ग्रंथ साहित्यात |
राष्ट्राचे चैतन्य ऐतिहासिक वारशात |
राष्ट्राचे चैतन्य गोड प्रांजळ आरशात || ३ ||
राष्ट्राचे चैतन्य वसे माणसामाणसात |
राष्ट्राचे चैतन्य दूर्मिळ मूक्याजनावरांत |
आणिक तेही दिव्यजन, जें अजुनही दूर्लक्षित |
चारू म्हणे चैतन्यबीज, माझें विठ्ठल रखुमाईत || ४ |||


Popular posts from this blog

Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Temple