कमावलेली सर्वचं ईश्टेट, अखेरीस होईंल,वारसदाराचे नावावर | तू मृत्यूशय्येवर, त्यांचे दावे संपत्तीवर | तू फोटोफ्रेममध्येचं, ते मोकाट गावभर || १ || व्यवहारातील गणितात, तू बाजी मारलींस सदा, हशा आणि टाळ्यांनी, तू चमकलांस सानंदा | परि, हृदय तूझे मुंगीएवढे | ज्यातील प्रेम टिपूसभर !! २ !! लोकं येतात, लोकं जातात | काही हसतात, काहीं रडवतात | काही हाणतात, काहीं हिनवतात | तर काही जीवनाचा, अनमोल मंत्र सांगून जातात !! ३ !! राहिलांस जर भानावर तर, होईल तूझी कीर्ती | "नजर हटी दूर्घटना घटी" तर, अवघ्या आयुष्याची माती !! ४ !! जसा ज्याचा समाज, शिक्षक, आणि माता-पिता, तसा त्याचा वावर, संग, पुत्री अथवा पुता | आयुष्याच्या तिजोरीत पैशांपेक्षा संस्कारस्थान श्रेष्ठ, संकेत न कळाला तर वायाचं तूझे कष्ट || ५ || मंदिरात गेला म्हणून देव प्रसन्न होत नाही, त्यासाठी देवासारखं रहावं आणि वागावं लागतं | तू केल्यास जरी शेकडो चारधाम अन् हजयात्रा | तरी, प्रत्यक्ष सतकृतीविण तूला मिळणार नाही स्वर्ग, समजलं का मित्रा ?? ६ ?? बायका-पोरं-नातवंड हे, असतातं सोबत काहीचं नवस | त्यापुढे आपल्यालाचं जावं लागतं, चारू म्हणे एक दिवस...
Posts
Showing posts from June, 2020