कमावलेली सर्वचं ईश्टेट,
अखेरीस होईंल,वारसदाराचे नावावर |
तू मृत्यूशय्येवर, त्यांचे दावे संपत्तीवर |
तू फोटोफ्रेममध्येचं, ते मोकाट गावभर || १ ||
व्यवहारातील गणितात, तू बाजी मारलींस सदा,
हशा आणि टाळ्यांनी, तू चमकलांस सानंदा |
परि, हृदय तूझे मुंगीएवढे |
ज्यातील प्रेम टिपूसभर !! २ !!
लोकं येतात, लोकं जातात |
काही हसतात, काहीं रडवतात |
काही हाणतात, काहीं हिनवतात |
तर काही जीवनाचा, अनमोल मंत्र सांगून जातात !! ३ !!
राहिलांस जर भानावर तर,
होईल तूझी कीर्ती |
"नजर हटी दूर्घटना घटी" तर,
अवघ्या आयुष्याची माती !! ४ !!
जसा ज्याचा समाज, शिक्षक, आणि माता-पिता,
तसा त्याचा वावर, संग, पुत्री अथवा पुता |
आयुष्याच्या तिजोरीत पैशांपेक्षा संस्कारस्थान श्रेष्ठ,
संकेत न कळाला तर वायाचं तूझे कष्ट || ५ ||
मंदिरात गेला म्हणून देव प्रसन्न होत नाही,
त्यासाठी देवासारखं रहावं आणि वागावं लागतं |
तू केल्यास जरी शेकडो चारधाम अन् हजयात्रा |
तरी, प्रत्यक्ष सतकृतीविण तूला मिळणार नाही स्वर्ग,
समजलं का मित्रा ?? ६ ??
बायका-पोरं-नातवंड हे,
असतातं सोबत काहीचं नवस |
त्यापुढे आपल्यालाचं जावं लागतं,
चारू म्हणे एक दिवस || ७ ||
ऐकून ही दुनियादारी,
तू होऊ नकोस नर्व्हस |
आज, अभी और इसी वख्तसे,
कर शुद्ध कर्म का साहस,
कर शुद्ध कर्म का साहस || ८ ||| - ८ जून, २०२०