7 May 2020 | Charudatta Thorat Books of Nation

Charudatta Thorat Book/
For Purn Kaliyuga - Matpriya Gyan Vyavastha
वाईट अशा येत्या पूर्णकलियुगाच्या उंबरठ्यावर...
• || मत्प्रिय "ज्ञानव्यवस्था" ||

चारित्र्यनिर्माणकारी "विज्ञान"व्यवस्था पाहिजे
गुरूंच्या सानिध्यात " एकलव्य " घडला पाहिजे
जिथे नसावीत कागदी छापखाने आणि रटाळ शिक्षण
प्रयोगशील वातावरणात असा,
" शास्त्रज्ञ " दडला पाहिजे.

पावित्र्यनिर्माणकारी "श्रीज्ञान"व्यवस्था पाहिजे
परस्त्रींस " माता " लेखणारा, पुरूष घडला पाहिजे
जिथे नसावीत प्रसिद्धीपोटी भाईचाऱ्याचे शोभसमारंभ
नात्यांच्या पलिकडला असा,
" माणूंस " दडला पाहिजे.

विवेकमंथननिर्माणकारी "सुज्ञान"व्यवस्था पाहिजे
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेतून " अर्जुन " घडला पाहिजे
जिथे नसावींत परिक्षांच्या तारिखवार गुणवत्ता
सेवा-श्रमदानहेतूक असा, " विद्यार्थी " दडला पाहिजे.

अभ्यासशील-व्यसनमुक्त "सज्ञान"व्यवस्था पाहिजे
स्वदेशीच्या प्राप्तीर्थ " कर्मयोगी " घडला पाहिजे
जिथे नसावींत दूर्बल-मनाची उद्योगमय शोकांतिका
खुल्या न्यायमंदिरात असा,
" ज्ञानयोगी " दडला पाहिजे.

सरस्वतीनिर्माणकारी "प्रज्ञान"व्यवस्था पाहिजे
"अखंड-ज्ञान-योग" त्रिसुत्रींचा " दत्ताश्रय " घडला पाहिजे
जिथे नसावीत रिटायर होवुन स्वप्नं अंथरणारी वृद्धदशा
अनुभवातून अनुभूतीकडे प्रवासशील असा,
"प्रशिक्षक " दडला पाहिजे...!

- महाकवी विष्णुभक्त चारूदत्त

==============

Charudatta Thorat Books

Popular posts from this blog

Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Temple