Charudatta Thorat | Poems of Lord Vishnu
Charudatta Thorat | वैकुंठ्यागमन
व्याधी नको, समाधी हवी |
भिती नको मज मुक्ती दाखवी |
अंधःकार नको गां, सामर्थ्य मज देई |
दिव्यप्रकाशाभिभूत वैकुंठ्यीं नेई ||
नकों गां आधिन करूं, विषयव्यग्र बाहूपाश |
नकों गां हृदयमंदिरी तों विश्वमहाविनाश |
तप भक्त प्रल्हादाचें जें विष्णुप्रीती अंतरी |
तेचिं बोलु पाहीं माझीं दत्ताश्रय नगरी ||
जनन जयाचें पापाधिन,
तेथीं मृत्यू विषयाधिन |
दिव्य भक्तीर्थ दिव्यप्रेम |
जया नाहीं खूण व्याधीकेचिं विषम ||
दिव्यानंदी प्रभ्रूमंडपी साक्षात्कार परमेंचिया |
तेथिं मज लागीं नेंदी, व्यापतसे व्याधीमाया |
चारू म्हणें प्राणप्रिय जयाचींया संगती |
सत्यतेचीं आगतिक द्यावीं मजला प्रीतीः |||
|| श्रींऽस्तुःभ्रातम्ऽश्रीहरिः |||
Poems of Lord Vishnu