काव्य विष्णु चैतन्य | Kavya Vishnu Chaitanya | Charudatta Thorat Letest

Charudatta Thorat Books in Marathi language  for Online
by Kavya Vishnu Sadan Gyan Mandir
"काव्य विष्णु चैतन्य"

मी चैतन्याचा वारसा, मी चैतन्याचा ठेवा
मी चैतन्याचा आरसा, मी चैतन्याचा हेवा
मी चैतन्याचा ऋणी, मी चैतन्याचा साक्षी
चैतन्य माझे उरी, चैतन्यप्रत्यक्षदर्शी !

चैतन्य ठायी ठायी, चैतन्याविण मी नाही
चैतन्य पायी पायी, अखंडमार्गमयी
चैतन्याने भारावलेलां, मी चैतन्याचा साक्षी
चैतन्य माझे उरी, चैतन्यप्रत्यक्षदर्शी !

चैतन्य दिव्युज्वल, प्रकाशातीत तेजांकुल
चैतन्य चेतनामूळ, विश्वसमुच्चयसंकुल
चैतन्याने प्रजीवित, मी चैतन्याचा साक्षी
चैतन्य माझे उरी, चैतन्यप्रत्यक्षदर्शी !

चैतन्य विष्णुमय, काव्यविष्णुसदनाश्रय
चैतन्य अखंडमय, बोधले गां दत्ताश्रय
चारू म्हणे चैतन्यबीज, मी चैतन्याचा साक्षी
चैतन्य माझे उरी, चैतन्यप्रत्यक्षदर्शी !

|| महाकवी चारूदत्त ||

Popular posts from this blog

Lord Vishnu Bhakta Charudatta Thorat Temple