Maha Mantra Charudatta
विष्णुभक्त चारूदत्त गुप्तज्ञान दत्ताश्रय ग्रंथ online📚 , Charudatta Thorat Abhanga, Charudatta Thorat Grantha, Charudatta Thorat Govi, Charudatta Thorat Akhandani, Charudatta Thorat Poems, Charudatta Thorat Books, Lord Vishnu bhakta Charudatta Letest Pages LIVE
Maha Mantra
महामंत्र
स्वच्छतेचे प्रतिक चिन्ह,
लावूनी घ्या हो सारे जन |
मनामनाने, जनाजनाने,
स्वेच्छेने पुढे येऊन ! स्वेच्छेने पुढे येऊन !
स्वच्छता ही स्वतःपासून,
स्वच्छता ही घराघरातून,
स्वच्छता ही गांव-शहरांतून,
स्वेच्छेने पुढे येऊन ! स्वेच्छेने पुढे येऊन !
अस्वच्छतेंस अंत नाही,
त्याने रोग उत्पन्न होई |
दारिद्य नाशिवंतीचा यारे झाडू घेऊन,
स्वेच्छेने पुढे येऊन ! स्वेच्छेने पुढे येऊन !
आंतरिक संपत्तीने समृद्ध घडविण्या |
प्रेमयुक्त, भयमुक्त प्रगतीर्थ नेण्या |
वैश्विक-महासत्ता दावू भारतांस बनवून |
स्वेच्छेने पुढे येऊन ! स्वेच्छेने पुढे येऊन !
नवनीत साफल्याची जीवनशैली धरा |
नवनीत नवयुक्त सन साजरे करा |
इतिहासाच्या सुवर्णांत सुदृढ भविष्य साकारून |
स्वेच्छेने पुढे येऊन ! स्वेच्छेने पुढे येऊन !
मृत्यूस अंत हा नाही, तो कधी कुठेही येई |
उच्चनीच भेद, मृत्यूस मान्य नाही |
चारू म्हणे गंगाईचे, जाऊ अवघे ऋण फेडून |
स्वेच्छेने पुढे येऊन ! स्वेच्छेने पुढे येऊन !
हा महामंत्र उच्चारून ! हा महामंत्र उच्चारून !
Dattashraya..
The Way of Akhand Gyan Yoga